थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी

पनवेल दि.२७ (प्रतिनिधी) :जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकऱ्यांचे दृष्टे नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्या अनुषंगाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २७) या तयारीची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, प्राचार्य वसंत ब-हाटे उपस्थित होते. ...)



स्व, जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथमच देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटाल याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार अ विशेष अतिथी म्हणून उद्योग,



खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, तर सन्माननिय उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः विशेष लक्ष देत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी , गडदे, यांच्यासह संचालक मंडळ व सहकारी विशेष मेहनत घेत आहेत.