पनवेल दि. २७ (प्रतिनिधी) : शिक्षणक्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठी राजभाषा दिन' मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा अरूण घरत, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे, पर्यवेक्षक अजित सोनवणे व प्रशांत मोरे, मराठी प्राथमिक विभागचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्वला कोटीयन, इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर तसेच पत्रकार उपस्थित होते, राजभाषा दिनानिमित्त विद्यालयात ग्रंथदिंडी, लेझीम पथक, मराठी भाषा महत्व पर घोषणा, गीते, भाषण या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मराठी मायबोलीचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, व प्रत्येक विविध भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचे महत्व पटले पाहिजे, तसेच त्यांनी विदयार्थ्यांना मराठी मायबोलीचे महत्व पटवून दिले व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या , या उपक्रमाबददल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, संचालक व आमदार प्रशांत ठाकूर, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.