भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी किमान १२ वर्षे लागतील, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. वडाळा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असा टोला काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. साधारणतः पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पीएचडी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात. म्हणून मला वाटतं की, चंद्रकांत पाटील यांना थिसिस पूर्ण करण्यासाठी किमान दहा ते बारा वर्षे लागतील, असा जोरदार टोला पवार यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १२ वर्षे लागतील: शरद पवार