इंटक तर्फे कामगार नेते महेंद्र घरत यांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र इंटकच्या काळाघोडा मुंबई येथील नुतनीकृत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. काळाघोडा मुंबई कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंराव चव्हाण सभागृहामध्ये राज्य स्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनासाठी महसुलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, गृह राज्यमंत्री मा. ना. सतेज पाटील, नामदार नितीन राऊत, नामदार अमित देशमुख व विधानसभेचे अध्यक्ष मा. ना. नानाभाऊ पटोले उपस्थित होते.



अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय इंटकचे अध्यक्ष मा. डॉ. संजीवा रेकृी होते. यावेळी महाराष्ट्र इंटकच्या कार्यालयाचे नुतनीकरणाची जबाबदारी ज्यांनी पार पाडली व अतिशय सुदंर असे कार्यालय महाराष्ट्र इंटकच्या कार्याकर्त्यासाठी कार्यान्वीत करण्यासाठी जबाबदारी लिलया ज्यांनी पार पाडली असे झुंजार कामगार नेते महाराष्ट्र इंटकच्या पाठीचा कणा ज्यांना समजले जाते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरांवर कामगारांचे नेतृत्व करणारे महेंद्रजी घरत यांचा कृतज्ञता म्हणून हद्य सत्कार महाराष्ट्र इंटकच्या वतीने विधानसभेचे अध्यक्ष मा. ना.  नानाभाऊ पटोले यांचा शुभहस्ते व ना. बाळसाहेब थोरात, ना. सतेज पाटील, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले कि अनेक वर्ष जीर्ण अवस्थेत असलेले मुंबई कार्यालय नुतनीकरणाची संकल्पना महेंद्र घरत यांनी नुसती मांडली नाही तर स्वखर्चाने लाखो रूपये खर्च करून आज ती कल्पना प्रत्यक्षात  आणून कामगार क्षेत्रात या देशात सर्वप्रथम कॉरपोरेट प्रशस्त कार्यालय गोरगरीब कामगारांच्या कल्याणासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी मा. ना. बाळासाहेब थोरात , मा. ना. सतेज पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री इंटकच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्यासाठी कटिबदध असल्याचे सांगितले. तर विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून कामगार चळवळीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले, तर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी केन्द्रातील भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला चढवीत हे सरकार हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करीत कामगार चळवळीला बेदखल करीत नवरत्न कंपन्या विकायला काढीत आहे व भांडवलदारांचे दलाल म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. यावेळी राज्यभरातून इंटक संलन्ग संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.