पनवेल दि. २७ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त व डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज्यसभेचे खासदार डॉविनय सहस्त्रबुद्धे यांचे 'नागरिकत्व कायदा' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यलयात होणाऱ्या या महत्वपूर्ण व्याख्यानाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. रविंद्र इनामदार, कार्यवाह राजीव समेळउपाध्यक्ष डॉ. कीर्ती सम्द्र यांनी केले आहे.
शनिवारी खासदार डॉ. विजय सहस्रबुद्धे यांचे 'नागरिकत्व कायदा' यविषयावर व्याख्यान