आर्यन माऊंटन, चौक येथिल कामगारांनी स्विकारले महेंद्र घरत यांचे नेतृत्व

चौक दि. २७ : : स्थानिकांच्या जमिनींवर प्रकल्प उभारून कंत्राटाअंतर्गत स्थानिक तरूणांनी दहा बारा वर्ष काम करून सुद्धा अचानक तडकाफडकी ३९ कामगारांना कामवरून कमी केलेल्या चौक परीसरातील स्थानिक तरूणांनी कामगार नेते महेंद्रजी घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहेसंघटनेच्या नामफलकाचे अनावरण आज करण्यात आले__



यावेळी आपल्या घणाघाती भाषणात महेंद्रजी घरत म्हणालेकी, स्थानिक पुढाऱ्यांना व पोलिस प्रशासनाला हाताशी धरून हे परप्रांतीय मालक स्थानिक तरूणांवर अन्याय करत आहेत, जर स्थानिकांना बेरोजगार करत असाल जर तुमचे ही धंदे बंद करू, हे महाआघाडी सरकारचे शिवराज्य आहे. येथे सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. वेळ प्रसंगी आंदोलन, रास्तारोको करावा लागला तरी चालेल परंत या तरूणांना पून्हा रोजगार मिळालाच पाहिजे असे महेंद्रजी घरत म्हणाले, यावेळी माजी उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परीषद सदस्य सुरेश पाटील, समिर दळवी, सरचिटणीस वैभव पाटील, संघटक दिपक ठाकूर, रोहिदास गायकर, केसरीनाथ नाईक, पोयंजेचे सरपंच जगदीश मते, उपसरपंच प्रविण भोईर, कृष्णा गायकर, अरूण पाटील, अक्षय भागीत, लक्ष्मण ठाकूर, दामोदर चोरघे व कंपनीतील कामगार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.