नवी मंबई दि. २५ : तळोजा भागातील शिव कॉर्नर इमारतीत पत्नी व दोन मुलाचा हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या नितेशकुमार उपाध्याय याचे भाऊ सोमवारी नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र नितेशकुमार हा गेल्या दिड-दोन वर्षापासून त्यांच्या संपर्कातच नसल्याचे तसेच तो कुटुंबासह मुंबईत कामासाठी आल्याची माहिती त्यांना नसल्याचे त्याच्या भावांनी स्पष्ट केल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे या घटनेमागचे गुढ आणखी वाढले आहे. अखेरीस या गुन्ह्यात पोलिसांनी मृत नितेशकुमार आणि त्याची पत्नी बबली या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक या दोघांच्या मुळ गावी पाठविण्यात आले आहे.
मुळचा दिल्ली येथे रहाणारा नितेशकुमार उपाध्याय याने आपली त्यानंतर स्वतः देखील गळफास व तळोजा फेज-१मध्ये रहाणारा पत्नी व दोन मुलांची हत्या करुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नितेशकमार याची दोन्ही मले गत ३ जानेवारीपासन शाळेत गेले नसल्याचे आढळन आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने त्यानंतर हा प्रकार केला असावा अशी शक्यता व्यक्त करत सदर घटना महिनाभरापूर्वी घडली असण्याची शक्यता परिमंडळ-२चे पोलीस उपआयुक्त अशोक दुधे गळफास यांनी व्यक्त केली आहे.
घटना दरम्यान, आत्महत्ये पुर्वी नितेशकुमार याने लिहीलेल्या चिठ्ठिमध्ये आम्ही स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे तसेच याला दुसरे कुणी जबाबदार नसल्याचे याना स्पष्ट केले आहे. मात्र नितेशकुमारने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी दिल्ली येथे रहाणाऱ्या नितेशकुमार यांच्या नातेवाईकांना बोलाऊन घेतल्याने सोमवारी त्याचे भाऊ नवी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या चौकशीत नितेशकुमार हा गेल्या दिड-दोन वर्षापासून संपर्कात नसल्याचे तसेच तो मुंबईत कामासाठी कुटुंबासह आल्याची माहिती सुद्धा त्यांना नसल्याचे नितेशकु मारच्या भावांनी पोलिसांना सांगितले आहे. ..