निद्रिस्त महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराचा भाजपातर्फे पनवेलमध्ये जाहीर निषेध

पनवेल दि. २५ (प्रतिनिधी) : सत्तेच्या लालसेपोटी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सपशेल फोल ठरलेल्या व निद्रिस्त असलेल्या महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात आज (मंगळवार, दि. २५) पनवेल भाजपाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.



सातबारा कोरा करा, महिलांवरील अत्याचार रोखा, जनतेचे पैसे लाटणाऱ्या बँकेवर कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, कर्नाळा बँकेकडून ठेवीदारांना पैसे मिळालेच पाहिजेत, तसेच शेतकरी कष्टकऱ्यांना दिलेले शब्द का पाळले जात नाहीत याची महाविकास आघाडी सरकारने जनतेला उत्तरे द्यावीत, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. सकाळी १० वाजता सुरु सत्तेवर झालेले हे धरणे आंदोलन दुपारी ०३ वाजेपर्यंत झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिलदारांना या फसवणूक संदर्भातील निवेदन देण्यात आले. महाविकास जनादेशाचा अपमान करून बेफिकीरी महाविकास आघाडी सत्तेवर आलेल्या शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतक-यांची घोर फसवणूक केली. त्याचबरोबर या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरी मुळे राज्यात आघाडी सरकारच्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दिवसेंदिवस ढासळती कायदा सुव्यवस्था याकडे तसेच आर्थिक गैरव्यवहाराबाबत आघाडी सरकार फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहे. आघाडी सरकारमध्ये ...) वृत्त पान ४ वर -