महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा

जेएनपीटी दि २५ ( अनंत नारंगीकर ) : महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी उरण भाजपाच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण तहसिल कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.



अध्यक्ष रवीशेठ भोईर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत,उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते सुधिर घरत, भाजपचे नेते पंडित घरत,महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, सरपंच दामोदरशेठ घरत, पाणजे सरपंच हरेश्वर भोईर, युवा नेते दिनेश तांडेल, युवा मोर्चा ता.अध्यक्ष शेखर तांडेल,तालूका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत,दिपकशेठ भोईर, सुनिल पाटील, संगीता पाटील, आजी माजी नगरसेवक, सरपंच उपसरपंच आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयाजवळून हा मोर्चा तहसिलदार कार्यालयाबाहेर आला. तेथे अनेक कार्यकर्त्यांनी भाषणबाजी करून महाविकास आघाडीच्या कारभारावर टिका केली. त्यानंतर उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांना या बाबतचे निवेदन देण्यात आलेयावेळी नायब तहसिलदार संदिप खोमणे उपस्थित होते.